पूर्व विदर्भातील परंपरागत पाणी-व्यवस्थापन
पाण्याला आपण जीवन म्हणतो. पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणूनच त्याला जीवन म्हणायचे काय? आपल्या देशात जेथेजेथे पाणी-व्यवस्थापनाच्या परंपरागत पद्धती विकसित झाल्या आहेत त्या पाहिल्या, तेथील लोकाचे त्या पद्धती विकसित करण्यामागील विचार आणि तंत्रे पाहिली, पाण्याचा वापर करण्याचे नीतिनियम पाहिले, तर पाण्याला जीवन का म्हणतात ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येते. अशीच पाणी व्यवस्थापनाची …